नितीन देसाई यंदाही साकारणार होते 'लालबागच्या राजा'च्या देखावा, बहूतांश काम पूर्ण...; यावर्षी काय होता मास्टर प्लान?

नितीन देसाई यंदाही साकारणार होते ‘लालबागच्या राजा’च्या देखावा, बहूतांश काम पूर्ण…; यावर्षी काय होता मास्टर प्लान?

| Updated on: Aug 04, 2023 | 1:16 PM

VIDEO | नितीन देसाई यांची लालबागच्या राजावर होती श्रद्धा, यंदाही तेच उभारणार होते देखावा; मृत्यूपूर्वी बहुतांश काम पूर्ण आणि...

मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबईतील लालबागच्या राज्याच्या देखाव्याचं काम नितीन देसाई यांच्याहस्ते होणार होतं. त्याप्रमाणे लालबागच्या राजाच्या देखाव्याचे कामं नितीन देसाई यांनी सुरू केलं होतं. त्यापैकी बहुतांश काम नितीन देसाई यांच्याहस्ते आणि मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबईतील लालबागच्या राज्याच्या देखाव्याचं काम नितीन देसाई यांच्याकडे देण्यात आले होते. यापैकी लालबागच्या राज्याच्या देखाव्याचं मुख्य काम पूर्ण झाले असून आता फक्त जोडणीचं काम बाकी असून ते इतक कारागिरांमार्फत सुरू आहे. यंदाच्या वर्षी नितीन देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सेट बनवायचा होता. त्याचे काम स्वतः नितीन देसाई यांनी ३१ जुलै पूर्वीच केले होते. दरम्यान, नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनचा धक्का बसला. नितीन देसाई यांच्या निधनामुळे लालबाग राजा मंडळाच मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला.

Published on: Aug 04, 2023 01:13 PM