Special Report | ‘हिमालया’ला Kolhapurच्या ‘पाईपलाईन’चं चॅलेंज
राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीचे चित्र आता कोल्हापूरातही पाहायला मिळणार का हेच आता काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
कोल्हापुरातील उत्तर पोटनिवडणूक असल्याने आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापुरकडे लागले आहे. शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता मतदानाआधीच आव्हान प्रतिआव्हानांचा सामना कोल्हापुरात रंगू लागला आहे. चंद्रकांत पाटील आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एकमेकांना आव्हान देत भूतकाळात केलेल्या वक्तव्यांची आठवण करुन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीचे चित्र आता कोल्हापूरातही पाहायला मिळणार का हेच आता काही दिवसात स्पष्ट होणार आहे.