Chhagan Bhujbal | आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा
केंद्राकडे ओबीसीं(OBC Reservation)चा डेटा नव्हता, मग देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)नी कोणता डेटा त्यावेळी केंद्राकडे मागितला? त्यावेळा ते म्हणाले नाहीत, की डेटा नाही, किंवा सदोष आहे. केंद्र सरकार त्यावेळेला काहीही बोलले नाही. मात्र आता केंद्र सरकार एकच म्हणत आहे, आता आमच्याकडे डेटा नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

‘मध्य प्रदेशातही ट्रिपल टेस्ट’
देशातले ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. मध्य प्रदेश(Madhya Pradesh)मध्येही ट्रिपल टेस्ट लागू केले आहे. कोरोनाच्या परिस्थिती हे कसे शक्य होईल, याचा मंत्रिमंडळात विचार करू, असे ते म्हणाले. भाजपा जर राज्य सरकारला यात दोषी धरत असेल तर मध्य प्रदेशच्या बाबतीत त्यांचे काय मत आहे, असा सवालही त्यांनी केलाय.
‘कामाला लागू’
येत्या तीन महिन्यात विविध खाती, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावून डेटा जमा करू, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. आताच्या १७ जानेवारीला पुन्हा ही सुनावणी होणार आहे. ही निवडणूक जनरलमध्ये होईल. आता आयोगाने काम जलदगतीने पार पाडले तर पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.