तुम्ही एक छगन भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, कुणी दिला इशारा?

तुम्ही एक छगन भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, कुणी दिला इशारा?

| Updated on: Nov 16, 2023 | 6:02 PM

आमचा एक ओबीसी नेता छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा होत असेल तर राज्यातील ओबीसी समाज ६० टक्के आहे. तो तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशाराच प्रकाश शेंडगे यांनी दिलाय.

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | तुम्ही एक छगन भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडणार, असे म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला इशारा दिलाय. शेंडगे म्हणाले, छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात फक्त मराठा मतदार नाहीत. तर त्यांच्या मतदार संघात ओबीसी, धनगर, मराठा, दलित आणि मुस्लिम मतदार आहे. जर मराठा समाजातील लोकांनी छगन भुजबळ यांनी मतदान केलं नाही तर इतर लोकं त्यांना मतदान करणारच आहे. पण जर छगन भुजबळांबद्दल अशी भाषा महाराष्ट्रात वापरत असतील तशीच ती भाषा सुरू राहिली तर कठीण असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. तर आमचा एक ओबीसी नेता छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा होत असेल तर राज्यातील ओबीसी समाज ६० टक्के आहे. तो तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशाराच प्रकाश शेंडगे यांनी दिलाय.

Published on: Nov 16, 2023 06:01 PM