Special Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात?
ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना (Maratha Morcha) सुरुवात होत असताना, तिकडे ओबीसी संघटनाही (OBC) आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झालं. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल. (OBC organizations announces protest from 16 june in Leadership of Chhagan Bhujbal from Nashik)
Published on: Jun 15, 2021 09:40 PM
Latest Videos