जुन्या पेन्शन बाबत आज तोडगा निघणार? राज्य मंत्रिमडळाची बैठक
जुन्या पेन्शन योजना संपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याचबाबत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे
मुंबई : देशभरात अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. त्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील 18 लाख कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणा, शिक्षण आणि सरकारी कामकाजावर झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याचबाबत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. याच्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, जुन्या पेन्शन बाबतचा निर्णय चर्चेतून होईल, चर्चेविना कोणताही निर्णय योग्य ठरणार नसल्याचे म्हटलं होतं. तर हा विषय बसून मार्गी लावला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊ नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री यांनी केलं होतं.
Published on: Mar 17, 2023 09:28 AM
Latest Videos