Omicron | 29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित, डॉ.संग्राम पाटील यांची माहिती

Omicron | 29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित, डॉ.संग्राम पाटील यांची माहिती

| Updated on: Dec 02, 2021 | 7:08 PM

ओमिक्रॉनचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अधिक वेगानं होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देश आणि महाराष्टासाठी ही चिंतेची बाब आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचा फैलाव जगातील 29 देशात झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर डॉ. संग्राम पाटील यांनी भीती बाळगण्याची गरज नाही पण काळजी घेणं गरजेचं आहे.

भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे. कारण शेजारील कर्नाटक राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे ओमिक्रॉनचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अधिक वेगानं होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देश आणि महाराष्टासाठी ही चिंतेची बाब आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचा फैलाव जगातील 29 देशात झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर डॉ. संग्राम पाटील यांनी भीती बाळगण्याची गरज नाही पण काळजी घेणं गरजेचं आहे.

जगातील 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला असून एकूण 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एका अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो. आम्ही जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमधील वाढ पाहत आहोत. त्यात युरोपचा वाटा 70 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.