मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, म्हणाल्या ‘मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा’
मुलुंड येथील मराठी असल्याच्या कारणावरून घर तृप्ती देवरुखकर यांना कार्यालयासाठी जागा देण्यास नकार देण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसानी दोन जणांना अटक केली होती. तृप्ती देवरुखकर यांची भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली.
मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ आणि विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी मुलुंड येथे तृप्ती देवरुखकर यांची भेट घेतली. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. तिच्या धाडसाचं कौतुक आहे. पंचवीस वर्षे मराठी माणसाच्या जीवावर राज्य करणारे बेगडी सगळे लोक आहेत. त्यांचा बेगडीपणा समोर येत आहे हाच प्रश्न विचारायची वेळ आली आहे. ‘मराठी आमचा धंदा निवडून द्या यंदा, अशा पद्धतीची निर्लज्ज भूमिका मराठी म्हणवणाऱ्यानी घेतली आहे. आम्ही मराठी वाढवू आणि मराठी संस्कृती वाढवण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी देत विरोधकांना टोला लगावला. विक्रोळीमध्ये महिलेसोबत झालेल्या छेडछाडी प्रकरणातील आरोपी काही क्षणातच पकडले गेले आणि कार्यवाही देखील केली. त्यामुळे प्रशासन काम करताना दिसून येत आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या. तर सदर घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी सर्व गृहनिर्माण सोसायटी यांना अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नोटिफिकेशन काढणार असल्याचं विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.