Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेबांना अनोखं वंदन, १० हजार ६०० तैल खडूंचा वापर करून साकारलं पोट्रेट

| Updated on: Apr 14, 2023 | 12:48 PM

VIDEO | मोसाइक कलाकार नितीन कांबळे यांची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त अनोखी मानवंदना, इंडिया बुक ऑफ रेकॉडमध्ये कलाकृतीची नोंद

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध मोसाइक कलाकार नितीन कांबळे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमीत्त अनोखी मानवंदना दिली आहे. नितीन कांबळे यांनी तब्बल १० हजार ६०० तैल खडू ( oil pestal) पासून ३ x २.५ फुटाचे पोट्रेट साकारले आहे. या आधी नितीन कांबळे यांनी अनेक मोसाइक पोट्रेट केले आहे, त्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पोट्रेटची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्डस इंडियामध्ये झाली असून आता दुसऱ्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. तर महामानव डॉ. बाबासाहे आंबेडकर यांचे तैल खडू ( oli pestal ) चा वापर करून साकारलेल्या पोट्रेटची नोंद सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉड मध्ये होणार आहे. ह्या पोट्रेटसाठी नितीन कांबळे यांनी फक्त ५ रंग संगतीचा वापर केला आहे आणि हे पोट्रेट नितीनने फक्त एका दिवसात पूर्ण केलं आहे.

Published on: Apr 14, 2023 12:43 PM
दादा भुसेंकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे युवराज; म्हणाले, हे सुद्धा तसचं…
अजित पवार हे अस्वस्थ; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचे वक्तव्य