Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अवलियानं साकारलं वाळुशिल्प, बघा व्हिडीओ

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अवलियानं साकारलं वाळुशिल्प, बघा व्हिडीओ

| Updated on: Apr 14, 2023 | 11:38 AM

VIDEO | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ल्यातील सागरतीर्थ बीचवर साकारलं देखणं वाळुशिल्प, कुणी उभारलं वाळूशिल्प?

सिंधुदुर्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ल्यातील सागरतीर्थ बीचवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाळुशिल्प साकारण्यात आले आहे. आरवली येथील चित्रकार रविराज चिपकर यांनी हे वाळुशिल्प साकारले असून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. आंबेडकर यांच्या वाळू शिल्पावर गौतम बुद्ध यांचेही छोटेसे शिल्प साकारून खाली जय भीम अशी अक्षरे वाळूने कोरल्याचे पाहायला मिळत आहे. हे वाळू शिल्प साकारण्यासाठी रविराज चिपकर यांना दोन तासाचा कालावधीत लागला. वाळू आणि रांगोळीचा वापर करून त्यांनी हे वाळुशिल्प साकारण्यात आले आहे. त्यांच्या या वाळुशिल्पाची आरवली येथे जोरदार चर्चा असून त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Published on: Apr 14, 2023 11:38 AM