‘डॅशिंग अन् दमदार भावी आमदार’, महापालिका मुख्यालयासमोर युवा सेनेकडून कुणाचे झळकले बॅनर?
राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने येताना आपल्याला पाहिला मिळाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकाच्या मुख्यालय समोर युवा सेनेकडून काय बॅनरबाजी?
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने येताना आपल्याला पाहिला मिळाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकाच्या मुख्यालय समोर चक्क युवा सेनेकडून नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत डॅशिंग आणि दमदार आमदार अशा आशेचा बॅनर झळकताना दिसत आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आलं आहे. सर्वांचं लक्ष हे बॅनर वेधून घेताना दिसत आहे. मुंब्रा मतदारसंघातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीसाठी कशाप्रकारे तिकीट देणार आणि तिकीट दिल्यास जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे देखील पाहण गरजेचे आहे, मात्र जितेंद्र आव्हाड हे गेल्या अनेक वर्षापासून मुंब्रा मतदारसंघातून निवडून येत आहे. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदारकीसाठी नजीब मुल्ला यांचा सामना जितेंद्र आव्हाड यांच्यात जर रंगला तर जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे गरजेचे राहणार आहे…