मविआबाबत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ याचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
सध्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून राज्यातील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेशाच्या ऑफर देण्यात येत आहे. अशीच ऑफर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही देण्यात आली आहे. तर BRS ने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक यांना देखील फोडले आहे.
नवी दिल्ली : कांद्याच्या प्रश्नावर राज्यात तेलंगणातील भारत राष्ट्र समिती म्हणजे BRS ने प्रवेश केला आहे. सध्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून राज्यातील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेशाच्या ऑफर देण्यात येत आहे. अशीच ऑफर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही देण्यात आली आहे. तर BRS ने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक यांना देखील फोडले आहे. ते आता BRS मध्ये प्ररेश करत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, ही लोकशाही आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षाला प्रत्येक राज्यात जाऊन प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यातूनच BRS जोरदार प्रचार करत आहे. त्याचा म्हणावा तेवढा परिणाम दिसणार नाही. पण नक्कीच BRS चा राज्यात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 25, 2023 04:40 PM
Latest Videos