कांद्यानं वांदा केला? केंद्र सरकाराच्या हुकूमशाही निर्णयाचा फटका; दोन दिवसात 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प

कांद्यानं वांदा केला? केंद्र सरकाराच्या हुकूमशाही निर्णयाचा फटका; दोन दिवसात 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प

| Updated on: Aug 22, 2023 | 12:27 PM

केंद्र सरकाराने निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करत विजेचा झटका कांदा उत्पादकांना दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत आंदोलनाचं शस्त्र काढलं आहे. त्यामुळे अनेक बाजार समित्यात कांद्याचा लिलाव बंद झाला असून बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

नाशिक : 22 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. चार पैसे कांद्यातून शेतकऱ्याला मिळत होते. शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात होतं. मात्र याच दरम्यान अचानक केंद्र सरकाराने निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जोराचा विजेचा झटका दिला. हा 240 होल्टचा झटका शनिवारी घेतलेल्या केंद्र सरकाराच्या हुकूमशाही निर्णयामुळे बसला आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी केंद्र सरकाराने पुनर्विचार करावा अशी मागणी आता संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांकडून आंदोलन केली जात आहेत. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार बाजार समित्यांमधील कांद्याचे खरेदी-विक्रीचे कामकाज बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर कांदा व्यापाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी कांदा लिलावाचे कामकाज बंद ठेवल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत होता. तर गेल्या दोन दिवसापासून कांदा लिलावाचे कामकाज बंद ठेवल्याने 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. आज नाशिक जिल्हाधिकारी यांच्या कार्यलयात व्यापाऱ्यांची बैठक बोलावली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्ली येथे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोणता तोडगा निघतो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 22, 2023 12:27 PM