ठाकरे यांच्या नावावर निवडून आलेल्यांची ठाकरेंवरच टीका, अजित पवार यांचा कुणावर हल्लाबोल
VIDEO | ठाकरे यांच्या नावावर निवडून येतात आणि त्यांच्यावरच टीका करतात, काय म्हणाले अजित पवार?
परभणी : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदार यांच्यावर नाव न घेता परभणीत चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांकरता मुंबईमध्ये शिवसेना स्थापन केली. हा शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवला आणि महाराष्ट्रात शिवसेना पोहोचवली. एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी सभा शिवाजी पार्कात घेतली. यावेळी शेवटच्या काळात त्यांनी सांगितले मी आता वयस्कर झालो, आता शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे घेतील, ते शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहतील आणि बाळासाहेबांच्या नावावर निवडून आलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताय. युवा नेता असलेले आदित्य ठाकरे पुढे येतंय तर त्यांच्यावरही टीका करताय, असा सवल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तर ते रॅली काढताय तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करताय, हा कुठला रडीचा डाव..असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
