‘वेळ पडली तर भाजप दाऊदलाही पक्षात घेतील’, कुणी केली भाजपवर सडकून टीका?
VIDEO | 'भाजप सत्तेसाठी सर्व काही खपवून घेईल इतकेच नाहीतर वेळ पडली तर भाजप दाऊदलाही पक्षात घेतील', भाजपने राज ठाकरे यांनी युतीसाठी ऑफर दिली अशी चर्चा असताना भाजपवर कोणत्या नेत्यानं केला जोरदार हल्लाबोल?
नागपूर, १५ ऑगस्ट २०२३ | ‘भाजप सत्तेसाठी सर्व काही खपवून घेईल इतकेच नाहीतर वेळ पडली तर भाजप दाऊदलाही पक्षात घेतील’, भाजपने राज ठाकरे यांनी युतीसाठी ऑफर दिली अशी चर्चा असताना भाजपवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, भाजपला सत्तेसाठी सगळंच खपते. सत्तेसाठी भाजप सगळंच खपून घेणारी आहे. ते देशाला समर्पित नसून भाजप हे सत्तेला समर्पित आहे. ज्यांच्या सत्तर हजार कोटी भ्रष्टाचाराचा आरोप लावला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहे. त्यांना काही फरक पडणार नाही त्यांच्या सोबत देशद्रोही भिडे हा आहेच. संभाजी भिडे हा पोलिसांच्या गराड्यात फिरतो, त्याची रस्त्यावर उभे राहायची ताकद नाही हे सगळं भाजपमुळे पुरस्कृत आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याला सॅल्युट मारायला पोलीस अधिक्षक तयार असतो, कुणाची कृपा आणि कोणाचा आशीर्वाद? असा सवाल उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हे महायुतीत आले तरी भाजपला चालेल इतकेच नाही तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्याला भाजप सुद्धा पक्षात घेईल, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.