राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध, उत्तर प्रदेशमध्ये पोस्टरबाजी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा वादात सापडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात जोरदार पोस्टरबाजी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे पाच जून रोजी आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील काही नेत्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर देखील झळकवण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी माफी मागूनच उत्तर प्रदेश दौऱ्यावर यावे अशी मागणी या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Published on: May 20, 2022 09:48 AM
Latest Videos