Pahalgam Attack : काश्मीरमधून रुपाली ठोंबरे सुखरूप पुण्यात, सुषमा अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रूंचा बांध फुटला
गेल्या दोन दिवसांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यावेळी रुपाली ठोंबरे पाटील या देखील काश्मीरमध्ये अडकून होत्या. नुकत्याच त्या पुण्यात सुखरूप परतल्या आहेत.
काश्मीरमधून सुखरूप पुण्यात परतल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काश्मीरमधून परत येताच विमानतळावरच रूपाली ठोंबरे पाटील यांची भेट घेतली आहे. परिस्थिती खूप भयानक होती, असं एकच वाक्य रूपाली ठोंबर पाटील म्हणाल्या आणि सुषमा अंधारे यांना बिलगल्या… गेल्या दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून भ्याड केला. या घटनेदरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील जम्मू काश्मीर होत्या. दरम्यान, काश्मीरातून पुण्यात विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना परिस्थिती खूपच भयानक असल्याचे वास्तव एका वाक्यात सांगितले. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘परत भारतात येताना महाराष्ट्रातील लोकं सोबत घेऊन आलो. त्यांची सोय करण्यात यश मिळालं यात समाधान आहे. पण हा थरार कधीच विसरू शकणार नाही. आयुष्याची काय किंमत असते हे लेकरांसोबत अनुभवलं आहे…’

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
