Pahalgam Attack : पहलगामचा दहशतवादी हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकार आदिल राजाचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ल्याबाबत एका पाकच्या पत्रकाराचा सनसनाटी दावा केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचा हात असल्याचा दावा पाकिस्तानी विश्लेषक आदिल राजा यांनी केला आहे
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार आदिल राजा यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. आदिल राजा यांच्या मते, पहलगाममधील हल्ला हा पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून म्हणजेच सांगण्यावरून करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. आदिल राजा यांनी आपल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले की, मुनीर यांना आणखी ५ वर्षांचा कार्यकाळ हवा आहे, त्यामुळे भारताविरुद्ध तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, मुनीर यांनी पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी भाषण केले होते. या भाषणात मुनीर यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती. यामुळेच पहलगाममधील दहशतवादी घटनेसाठी मुनीरला थेट जबाबदार धरण्यात येत आहे.
Published on: Apr 29, 2025 04:14 PM
Latest Videos

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती

पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
