Adil Hussain shah : अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न अन् दोन हात करताना आदिल हुसैन शाहनं गमावला जीव, नेमकं काय घडलं?
पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26 निष्पाप लोकांमध्ये सय्यद आदिल हुसैन शाह यांचा समावेश आहे, जो पर्यटकांना घोडेस्वारी पुरवत होता आणि जेव्हा त्याने मारेकऱ्यांचा सामना करण्याचा आणि दहशतवाद्यांशी लढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही गोळ्या घातल्या गेल्या.
काश्मीर येथील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. गोळीबार करून पर्यटकांवर हल्ला करण्यात आलेल्या घटनेत 25 ते 28 जणांचा मृत्यू झाला. अशातच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यादरम्यान अतिरेक्यांकडून बंदूक हिसकावणाऱ्या आदिल हुसैन शाह यांची देखील दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. अतिरेक्यांकडून बंदूक हिसकावणारा आदिल हुसैन शाह हा पर्यटकांना बैसरन येथे खच्चरवरून न्यायचं काम करायचा. मंगळवारी बैसरन येथे दशहतवाद्यांनी पर्यंटकांवर बेछूट गोळ्या झाडायला सुरूवात केल्या तेव्हा आदिल हुसैन शाह याने त्याला विरोध केला. झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अतिरेक्यांकडून बंदूक हिसकावणारा आदिल हुसैन शाह याची देखील दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या कुटुंबाशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी घरचा आधार गेल्याची भावना व्यक्त केली.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
