पाकिस्तानातील सत्तापेच कायम, राजीनामा देणार नाही, इमरान खान यांची ठाम भूमिका
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी राजीनामा न देण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानातील कॅबिनेट बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी राजीनामा न देण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानातील कॅबिनेट बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. इमरान खान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानात विरोधी पक्षाकडून इमरान खान यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास ठरावावर येत्या काही दिवसात मतदान होण्याची शक्यता आहे.