पंढरपूरकरांच्या जीवाशी खेळ, शुद्धीकरणाच्या नावाखाली लोकांना कोणतं पाणी प्यावं लागतंय? बघा व्हिडीओ
VIDEO | पंढरपुरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पंढरपूरकर नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे पाहायला मिळतंय. शुद्धीकरणाच्या नावाखाली इथल्या लोकांना कोणतं पाणी प्यावं लागतंय, बघा व्हिडीओ
पंढरपूर, २५ सप्टेंबर २०२३ | लाखो वारकरी आणि अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या पंढरपुरातील नागरिकांचा जीव आज धोक्यात आलाय. ज्या चंद्रभागेत कळत-नकळत झालेली पापं धुतली जातात, त्याच चंद्रभागेतील पाणी जीवघेणं बनलंय. शहरातून आणि आजुबाजूच्या गावातून येत असलेल्या सांडपाण्यावर, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन तेच पाणी आज पंढरपूरकरांना आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी दिलं जातंय. त्यामुळे पंढरपूरकर नागरिक आणि खास करुन महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सध्या शहरात एक दिवसआड पाणी सोडलं जातंय. मात्र, या पाण्याला वास येतो, त्यात आळ्या निघत आहेत. या पाण्यामुळे पोटाचे विकार जडत आहेत, अनेकांना जुलाब सुरु झालेत. अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडलीय. असं असलं तरी प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यांच्याकडून कुठलिही उपाययोजना होत नाही, असा आरोप इथले नागरिक करत आहेत.