Pankaja Munde | पंकजा मुंडे यांचे नाराज समर्थक मुंबईतल्या कार्यालयात दाखल
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (pankaja munde)
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोदी सरकारच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना डावलून भागवत कराड आणि भारती पवार यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मुंडे भगिनींनी शह देण्यासाठीच कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच मुंडे भगिनींनी एकाही मंत्र्याना शुभेच्छा दिल्या नाही. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर पंकजा यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर पंकजा यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज सकाळी वरळी येथील निवासस्थानाजवळी कार्यालयात नाराज समर्थकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.