झुरळांची ताकद म्हणावी तरी काय? प्रवासी नाही तर झुरळांसाठी चक्क एक्सप्रेस दीड तास पुणे स्थानकात थांबून...

झुरळांची ताकद म्हणावी तरी काय? प्रवासी नाही तर झुरळांसाठी चक्क एक्सप्रेस दीड तास पुणे स्थानकात थांबून…

| Updated on: Aug 06, 2023 | 7:53 AM

VIDEO | झुरळांची ताकद तरी काय आहे बघा, पनवेल ते नांदेड रेल्वे दीड तास पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली? पण कसं बघा व्हिडीओ

पुणे, ६ ऑगस्ट २०२३ | पुणे तिथे काय उणे हे आपण नेहमीच ऐकतो…पुण्यातील लोकं आणि त्यांच्या पुणेरी पाट्या आता जगभर पोहोचल्या आहेत. पुण्यातील लोकं काहीही करू शकतात असेही थट्टने त्यांना बोललं जातं. मात्र आता पुण्यातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रवाशामुळे एक्स्प्रेस थांबवण्यात आली नाही तर काही झुरळांमुळे तब्बल दीड तास ट्रेन पुणे स्थानकात रोखून धरली होती. पुणे स्थानकात झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस थांबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरंतर तुम्हाला ही बातमी अतिश्योक्ती वाटत असेल. पण नाही, ही बातमी खरी आहे. झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. पनवेल ते नांदेड या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालं. पनवेल आणि मधल्या स्थानकांवर रेल्वेत बसलेले प्रवासी या झुरळांच्या सुळसुळाटामुळे हैराण झाले. झुरळांचा बंदोबस्त झाल्याशिवाय रेल्वे पुढे न्यायची नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच प्रवाशांनी रोखून धरलेली गाडी सोडण्यात आली.

Published on: Aug 06, 2023 07:47 AM