परभणीत नेमकं काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीसोबत काय झालं? राहुल गांधींचा गंभीर आरोप
कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. त्यानंतर राहुल गांधींनी परभणी येऊन सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २० ते २५ मिनिट राहुल गांधींनी सोमनाथची आई आणि भावाशी चर्चा केली आणि दलित असल्याने सोमनाथची हत्या झाली त्यासाठी फडणवीसच जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.
अटक केल्यानंतर कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी काल भेट घेतली आणि याच भेटीनंतर सोमनाथ हा दलित असल्याने त्याची कोठडीमध्ये हत्या झाल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप राहुल गांधींनी केला. कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. त्यानंतर राहुल गांधींनी परभणी येऊन सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २० ते २५ मिनिट राहुल गांधींनी सोमनाथची आई आणि भावाशी चर्चा केली आणि दलित असल्याने सोमनाथची हत्या झाली त्यासाठी फडणवीसच जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला. जाती-जातीत द्वेष निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. त्यासाठीच ते परभणीत आले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटलवार केला. मात्र पोलिसांकडून सोमनाथची हत्या झाली असल्याचे पोलिसांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरून सिद्ध होतंय. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस खोटे बोलले अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
१० डिसेंबरला परभणीत एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. या घटनेचा निषेध म्हणून ११ डिसेंबरला परभणी बंदची हाक देण्यात आली. बंदाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये लॉच्या अंतिम वर्षाला असलेले ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशींचाही समावेश होता. अटकेनंतर सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयाने कोठडी मिळाली पण कोठडीतच मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी जबर मारहाण केल्याने सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सोमनाथचा मृत्यू शॉक ड्यू टू मल्टिपल इंज्युरीज असा उल्लेख आहे. म्हणजेच जखमांचा उल्लेख आहे. तर सोमनाथला श्वसनाचा दुर्धर आजार, छातीत जळजळ होत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.