आधी संसदेची रेकी मग घुसखोरी, महाराष्ट्रातील अमोल शिंदे अटकेत; मोठी माहिती उघड

| Updated on: Dec 14, 2023 | 4:48 PM

बुधवारी संसदेत चार तरूणांनी घुसखोरी केली. यानंतर संसदेत एकच भितीचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या तरूणांमधील एकाचं महाराष्ट्र कनेक्शन निघाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, संसदेतील घुसखोरी प्रकरणात अमोल शिंदे अटकेत आहे.

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२३ : बुधवारी संसदेत चार तरूणांनी घुसखोरी केली. यानंतर संसदेत एकच भितीचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या तरूणांनी कोणत्याच खासदाराला इजा पोहोचवली नाही मात्र त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सभागृहात आणि बाहेर स्मोक कँडलने धूर केला होता. या तरूणांमधील एकाचं महाराष्ट्र कनेक्शन निघाल्याने एकच खळबळ उडाली. लातूर मधील अमोल शिंदे नावाचा तरूण या प्रकारात सहभागी असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, संसदेतील घुसखोरी प्रकरणात अमोल शिंदे अटकेत आहे. तर पोलिसांच्या तपासातून असे समोर आले की, अमोल शिंदे यांने फायर क्रॅकर महाराष्ट्रातूनच नेले होते. त्याने बुटांची तपासणी होत नाही म्हणून बुटातून क्रॅकर नेले. तर मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात या तरूणांपैकी मनोरंजने संसदेची रेकी केली होती आणि त्यानंतर कट रचला असल्याचे उघड झाले आहे.

Published on: Dec 14, 2023 04:48 PM
दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार? शरद पवार आज अमित शाह यांची भेट घेणार, पण का?
राजेश टोपे यांना शिवीगाळ? बबनराव लोणीकर यांनी स्वतः ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर केला खुलासा, म्हणाले…