Parner | आत्महत्येचा असा कोणताच विचार डोक्यात नाही, ज्योती देवरेंचं पोलीस प्रशासनाला लेखी आश्वासन
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सुसाईट ऑडिओ क्लिपनंतर अहमदनगरमध्ये प्रशासन कामाला लागलेलं दिसतंय. अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आलीये. यानंतर या महिला तहसीलदाराने मी आत्महत्या करणार नाही अशी लेखी हमी अहमदनगर पोलीस प्रशासनाला दिलीय.
Parner | राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सुसाईट ऑडिओ क्लिपनंतर अहमदनगरमध्ये प्रशासन कामाला लागलेलं दिसतंय. अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आलीये. यानंतर या महिला तहसीलदाराने मी आत्महत्या करणार नाही अशी लेखी हमी अहमदनगर पोलीस प्रशासनाला दिलीय. उपविभागीय अधिकारी प्रांजल सोनवणे यांनी देवरे यांचं समुपदेशन केलंय, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलीय. | Parner Tehsildar Jyoti Devare assure police on suicide audio