NCB : मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त, एनसीबीची मोठी कारवाई

NCB : मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त, एनसीबीची मोठी कारवाई

| Updated on: Sep 29, 2022 | 1:40 PM

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त. गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान एनसीबीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : एनसीबीने मुंबई विमानतळावर (Mumbai Airport ) मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये  3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन (Black cocaine)जप्त करण्यात आलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान एनसीबीकडून (NCB) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान बॉलिव्हियन नागरिकत्व असलेल्या महिलेला अटक केली आहे. ती महिला हे ड्रग्ज घेऊन गोव्यातील एका व्यक्तीला देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Sep 29, 2022 01:32 PM