चिपळूणला महापुराचा धोका? हजारो वाहने महामार्गावर पार्किंग
येथे पाऊस वाढल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळूण शहर महापुराच्या छायेत आहे. येथे संततधार सुरू असल्याने नद्यांनी पूर आला आहे.
चिपळूण, 20 जुलै 2023 | मागील काही दिवसापसून कोकणला पावसाच्या जोरदार तडाखा बसत आहे. येथे पाऊस वाढल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळूण शहर महापुराच्या छायेत आहे. येथे संततधार सुरू असल्याने नद्यांनी पूर आला आहे. तर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महापुराची भीती आता चिपळुणकरांना लागली आहे. याच्या आधी महापूरामुळे चिपळुणकरांची वाहनं ही पाण्याखाली गेली होती. त्यामुळे या पावसातही चिपळुणला महापुराचा धोका आहे. यामुळे महापुराच्या भीतीने महामार्गावरच लोकांनी आपल्या गाड्यां पार्किंग केल्या आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव गाड्या महामार्गावर पार्किंग केल्या असून हजारो वाहने ही महामार्गावर आहेत. तर वाहने पार्किंग केल्याने महामार्गावर पार्किंगच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.