Mumbai | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Mumbai | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

| Updated on: Jun 27, 2021 | 9:48 AM

आतापर्यंत 30 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 7.71 आणि डिझेल 7.92 रुपयांनी महागले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने (Petrol) शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. (Petrol and Diesel price rates in Maharashtra)

पेट्रोलने शंभरी गाठलेल्या शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 30 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 7.71 आणि डिझेल 7.92 रुपयांनी महागले आहे.

Published on: Jun 27, 2021 09:46 AM