पुण्यात नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणाला सुरूवात

पुण्यात नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणाला सुरूवात

| Updated on: Mar 06, 2022 | 1:34 PM

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. त्यावेळी पुणेकरांनी टाळ्या वाजवून आणि मोदी मोदींचा गजर करत जोरदार स्वागत केलं. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं आहे. टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपालकृष्ण देशमुख, भांडारकर आणि रानडेंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले.