Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 8 November 2021

| Updated on: Nov 08, 2021 | 6:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडला आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहिले आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.

भाजपला मातीत गाडण्याची भाषा करणारेच गाडले गेले, मुंडेच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार
Special Report | मुंबई एसआयटी आणि एनसीबीमध्ये तपासाची शर्यत?