PM Modi Birthday | पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा; मेट्रोत मुलीनं दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, बघा VIDEO
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्यांना मेट्रोतून प्रवास करत असताना एका मुलीने अनोख्या स्टाईलनं शुभेच्छा दिल्यात
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी ते विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाईन विस्ताराचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. आज पंतप्रधान मेट्रोनेच विस्तारित मेट्रो मार्गावरून द्वारका सेक्टर-25 येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या वाढदिवसानिमित्त दिल्ली मेट्रोमधून प्रवास करताना दिसून आले. मोदी नवीदिल्लीतील विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईन विस्ताराच्या उद्घाटनासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोतील लहान मुलांसोबत गप्पा गोष्टी केल्यात. यासह महिलांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान, एक मुलगी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आली, तिने त्यांना अनोख्या पद्धतीने थेट संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. या मुलीनं संस्कृत भाषेतील गाणे गाऊन पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले. पाहा खास व्हिडिओ…