PM Modi : ‘प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढू आणि…’, पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदींची पहिलीच सभा, नेमकं काय म्हणाले?
'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बांगला बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होता. कोणी मराठी, कोणी ओडिया, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता. आज त्यांच्या मृत्यूवर कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एक सारखं आहे. आपला आक्रोश एक सारखा आहे. पर्यटकांवरच हल्ला झाला नाही.'
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा आज झाली. राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त बिहारमध्ये मुधबनी येथे ही सभा होती. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. ’22 तारखेला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे’, असं मोदी म्हणाले. तर देशाच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली. त्यांना शिक्षा देणारच.आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नसल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
