‘मी पुन्हा येणार’वरून पुन्हा वार-पलटवार, २०२४ ला भाजपसाठी स्थिती अनुकूल की नाही? काय म्हणाले शरद पवार?
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास वर्तविला पण शरद पवार यांनी मी पुन्हा येणार या फडणवीस यांच्या विधानाची आठवण करून देत जोरदार टीका केली.
मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास वर्तविला पण शरद पवार यांनी मी पुन्हा येणार या फडणवीस यांच्या विधानाची आठवण करून देत जोरदार टीका केली. तर २०२४ मध्ये भाजपसाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचाही दावा शरद पवार यांनी केलाय. यावेळी त्यांनी भाजपला कोण-कोणत्या देशात कौल मिळालेला नाही त्या देशाची नावंच सांगितली. दरम्यान, पुन्हा एकदा जे जे पुन्हा भाजप सोबत असतील ते आमचे नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी सुरू असलेल्या चर्चा खोट्या ठरवल्या. तर बैठकीला लपून गेलेल्या अजित पवार यांच्या चर्चांवर शरद पवार यांनी मिश्कीलपणे उत्तरही दिलं. “अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मी माध्यमांच्या समोरुन गेलो. माझी काच (गाडीची काच) खाली होती. मी फुलं स्वीकारली. तुम्ही बघितलं होतं का? मला तिथे फुलं दिली. मी फुलं घेतली मग निघालो”, अशी मिश्किल प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिरी. “मी माझ्यापुरता सांगू शकतो. इतर लोकांबद्दल सांगू शकत नाही”, असंही ते यावेळी म्हणाले. “राज ठाकरे यांनी काही दावा केला असेल तर त्यांना विचारा. मी त्यांचा प्रवक्ता नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी उत्तर दिलं.