PM Narendra Modi यांनी केले पत्रकारांचे तोंडभरून कौतुक, बघा काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
VIDEO | लोकसभेमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेची आठवण, म्हणाले, 'सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए'
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनास सुरूवात झाली आहे. सोमवारी या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या कामगिरीवर संसदेत चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सर्वांना संबोधित केले. आपल्या संसदीय प्रवासाची सुरूवात त्याची उपलब्धी, आलेले अनुभव त्याच्या आठवणी आणि मिळालेले धडे या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. तसेच पत्रकारांचे तोंडभरून कौतुक केल्याचेही बघायला मिळाले. पुढे मोदी असेही म्हणाले, आम्ही लोकप्रतिनिधी आपल्याला भूमिका बजावतो.पण आमच्या सोबत अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांच्या पिढ्या देखील बदलल्या आहेत. ते आम्हाला कागदपत्रे देण्यासाठी धावाधाव करतात. सभागृहाच्या कामकाजात गुणवत्ता आणण्यात त्यांच्या कार्याचाही मोलाचा वाटा आहे, मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कोणी स्वच्छता आणि सुरक्षा केली, अशा असंख्य लोकांनी आम्हाला चांगले काम करण्यास मदत केली आहे. या सदनाच्या वतीने मी त्यांना विशेष शुभेच्छा देतो.
यावेळी मोदी यांच्याकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेची आठवण देखील करण्यात आली. मोदी त्यांच्या कवितेच्या ओळी म्हणत म्हणाले, ‘सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए’