Andheri East Metro : 'या' दिवशी होणार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 चे उद्धाटन

Andheri East Metro : ‘या’ दिवशी होणार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 चे उद्धाटन

| Updated on: Jan 17, 2023 | 12:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मातोश्रीच्या अंगणात पंतप्रधान मोदी यांचे झळकले पोस्टर्स आणि कटआऊट्स... 19 जानेवारीला पंतप्रधान करणार मुंबईत मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 चे उद्धाटन

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 चे उद्धाटन होणार आहे. अंधेरी पूर्वमधील गुंदवली मेट्रो स्थानकाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्धाटनापूर्वी मेट्रो सुशोभिकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

मुंबईत मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 च्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर मातोश्रीच्या अंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन हे पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर आता मोदीच मेट्रो 2अ आणि मेट्रो 7 च्या लोकार्पणासाठी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जागो-जागी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआऊट्स देखील पाहायला मिळत आहे.

 

 

Published on: Jan 17, 2023 12:07 PM