शीतल म्हात्रे यांच्या संबंधित व्हायरल व्हिडीओप्रकरणी मोठी माहिती उघड
VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या संबंधित मूळ व्हिडीओ शोधण्यात पोलिसांना यश की अपयश?
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शीतल म्हात्रे यांच्या संबंधित मूळ व्हिडीओ शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. चुकीचं गाणं वापरून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचं आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तर दहिसर पोलिसांकडून या व्हिडीओचा तपास करण्यात आलाय. या प्रकरणी ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली होती. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. पण विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांनी मागणी केली होती. या घडलेल्या प्रकरणानंतर पोलीस याबाबत तपास करत होते.