पोलीस चौकीतच मांडला जुगाराचा डाव, व्हिडीओ व्हायरल; उपराजधानीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 09, 2023 | 10:03 AM

VIDEO | उपराजधानीमधील पोलीस चौकीत पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल; नागपूर पोलीस आयुक्तांचा दणका, तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

नागपूर, ९ ऑगस्ट २०२३ | नागपूर पोलीस चौकीमध्ये पोलिसांनीच जुगाराचा डाव मांडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या गोष्टींवर बंदी आणण्याची जबाबदारी पोलिसांवर असते तेच कृत्य पोलिसांकडून होताना दिसले. या प्रकरणात नागपूर पोलीस चौकीत पत्ते खेळणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित झाले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 लाकडी पूल येथील पोलीस चौकी पत्ते खेळणाऱ्या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. शहरातील गुन्हेगारी कारवायांबाबत अगोदरच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच पोलिसांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा खराब झाली. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

Published on: Aug 09, 2023 09:59 AM
रत्नागिरीतल्या नागरिकांच्या खिशाला चाट; बहुतांश भाज्या शंभरीच्या पटीत
आमदार अपात्रतेचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार? बच्चू कडू यांच्या विधानाने चर्चेला उधाण