इगतपुरी शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिकांमध्ये संताप!

इगतपुरी शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिकांमध्ये संताप!

| Updated on: Jul 25, 2023 | 11:15 AM

इगतपुरी शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा तयारीत आहेत.

नाशिक, 25 जुलै 2023 | इगतपुरी शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य रस्त्याच्या मागणीसाठी इगतपुरीकरांनी आमरण उपोषण केले, शहर बंद केले, तर विविध संघटनानी खड्यात वृक्षारोपण केले आणि रास्ता रोकोही केला, मात्र झोपी गेलेल्या बांधकाम विभागाने वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरती डागडुजी केली. यानंतरही पहिल्याच पावसाळ्यात या डागडुजीची पोलखोल झाली असून पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक जणांच्या गाड्यांचे नुकसान होत आहेत. विकासपुरुष म्हणवणाऱ्या आमदार खासदारांसह स्थानिक प्रतिनिधी याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा तयारीत आहेत.

Published on: Jul 25, 2023 11:15 AM