मनोज जरांगे पाटील यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, कुणी व्यक्त केली मोठी शंका?

मनोज जरांगे पाटील यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, कुणी व्यक्त केली मोठी शंका?

| Updated on: Jan 25, 2024 | 5:06 PM

मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले.... बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार असल्याचे म्हणत भाजप आणि अजित पवार यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.

पुणे, २५ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले आहे. अशातच बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार असल्याचे म्हणत भाजप आणि अजित पवार यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. तर मराठा समाजाला सरकार चॉकेलट देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. यामुळे सरकारने फसवा, फसवी करायला नको. यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न चिघळेल, असेही म्हटले आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त करत म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात तोडगा निघेल असे वाटत नाही. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण नकारता पंगतीत जेवण करावे, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिला.

Published on: Jan 25, 2024 05:05 PM