… ‘ते’ आदेश का दिले? मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर यांचा फडणवीस यांना थेट सवाल
मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा विरोध होता, या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना सवाल केलाय. तुम्ही मुख्यमंत्री असताना महाअधिवक्तांना कुंभकोणींना युक्तीवादपासून का रोखलं गेलं?
मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा विरोध होता, या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना सवाल केलाय. तुम्ही मुख्यमंत्री असताना महाअधिवक्तांना कुंभकोणींना युक्तीवादपासून का रोखलं गेलं? मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा विरोध होता, फडणवीसांच्या या दाव्यावरून विरोध आक्रमक झालेत. दिलेला शब्द पाळता येत नसल्याने शरद पवार यांच्याकडे बोट दाखवायचं का फडणवीस करताय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर यावरूनच प्रकाश आंबेडकर यांनीही फडणवीसांना सवाल केलाय. ज्या महाअधिवक्ता कुंभकोणींनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवलं त्यांना सुप्रीम कोर्टात बाजू न लढवण्याचे आदेश फडणवीस यांनी का दिले? असा सवाल करत त्याचं उत्तर मागितलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Dec 18, 2023 12:01 AM
Latest Videos