आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी नेत्यांना इशारा, तर भुजबळ यांनी काय केली विनंती?
मराठा आरक्षणावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी थेट ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय. तर जरांगे पाटील यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी सल्लाही दिलाय. बघा यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी थेट ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय. तर जरांगे पाटील यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी सल्लाही दिलाय. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, असे म्हणत आंबेडकरांनी थेट इशारा दिलाय. दरम्यान, आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मी त्यांच्या विरोधात बोललो नाही. माझी विनंती आहे त्यांना, या अडचणीच्या काळात तुमचं सहकार्य हवंय.’ तर आज ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय उद्या दलित आरक्षण धोक्यात येईल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. तर इतिहासात न जाता आंबेडकरांनी वास्तव पाहावं, असा खोचक सल्लाही दिलाय. तर मनोज जरांगे पाटील यांनी सल्लागारांचं ऐकून बोलू नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. बघा यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?