संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेला भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला, पक्ष कसा संपवायचा...

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला, “पक्ष कसा संपवायचा…”

| Updated on: Jul 27, 2023 | 3:05 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारावर टीका केली होती. यालाच प्रतिउत्तर म्हणून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केला. या सगळ्या घडामोडीनंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. त्यावरुन खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केला. या सगळ्या घडामोडीनंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळेजींवर टीका करणाऱ्या संजय राऊताचं डोकं फिरलं आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पक्ष कसा चालवायचा हे भाजपकडून शिका आणि पक्ष कसा संपवायचा हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून शिका.”

Published on: Jul 27, 2023 03:05 PM