“जयंत पाटलांच्या पोटात दुखण्याची सवय”, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा टोला
"आमच्या भागात विकास निधी आणायचा आहे. म्हणूनच आम्ही भाजप आणि शिंदे गटात जात असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचा" दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या विधानावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणे : “आमच्या भागात विकास निधी आणायचा आहे. म्हणूनच आम्ही भाजप आणि शिंदे गटात जात असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचा” दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या विधानावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी 30 वर्षांपासून काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते खरोखरच वाखण्याजोगं आहे. रस्त्यावर उतरून, गरज पडली तर नाळ्यात उतरून नायक चित्रपटामधल्या अनिल कपूरसारखे काम एकनाथ शिंदे करत आहेत.जयंत पाटील यांच्या पोटात दुखण्याची सवय आहे. त्यांच्या पक्षाअंतर्गत विषय आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. शिंदे-फडणवीस कधीच कोणत्या आमदाराला निधी कमी पडू देत नाही, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय?”, असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी केला आहे.