मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला; सरनाईक यांचा गंभीर आरोप, रोख कोणाकडे?
मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला असा गंभीर आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
मुंबई : मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला असा गंभीर आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांनी या भूखंडाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहीले आहे. भूखंड विक्रीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांनी ज्या नेत्यावर हे आरोप केले आहेत त्या नेत्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Published on: Oct 28, 2022 03:18 PM
Latest Videos