‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ बॅनरबाजीवर शिवसेनेच्या नेत्याची टीका; म्हणाला, “ही लोकं सत्तेसाठी…”
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर राज्यात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे सगळे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर लागणे स्वाभाविक आहे.
Published on: Jun 06, 2023 11:40 AM
Latest Videos