‘जेवढं दडपण आणाल,तेवढी उसळी मारुन पुढे येईन’, Pravin Darekar यांचं ठाकरे सरकारला आव्हान

‘जेवढं दडपण आणाल,तेवढी उसळी मारुन पुढे येईन’, Pravin Darekar यांचं ठाकरे सरकारला आव्हान

| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 6:50 PM

तसेच जेवढं दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तेवढी उसळी मारुन पुढे येईन, विधान परिषदेत पूर्ण ताकदीने लोकांचे प्रश्न मांडत राहणार, असं प्रविण दरेकर म्हणाले.

मुंबई बँक बोगस मजूर  प्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी त्या प्रकरणावर सत्र न्यायालयात सुनावणी होईल त्यानंतर सत्य समोर येईल. माझ्यावर कसलेही दडपण नाही, मी घाबरणाऱ्यातला नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. तसेच जेवढं दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तेवढी उसळी मारुन पुढे येईन, विधान परिषदेत पूर्ण ताकदीने लोकांचे प्रश्न मांडत राहणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीलाही नापास विद्यार्थी म्हणत पुन्हा डिवचलं आहे. तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.