८ दिवसात दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर… नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा काय?
प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारेंवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडला. या प्रस्तावावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्याचे पत्र देण्यात सांगितले. तर दिलगिरी व्यक्त करणारे पत्र न आल्यास... काय दिला निर्वाणीचा इशारा?
नागपूर, २० डिसेंबर २०२३ : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत एक व्हिडीओ व्हायरल केला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक होत त्यांनी यावर मत मांडत कोणतीही माहिती न घेता आरोप करणे चुकीचं असल्याचे म्हणत अंधारेंवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडला. या प्रस्तावावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. तर दिलगिरी व्यक्त करणारे पत्र न आल्यास प्रवीण दरेकर यांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तर ‘अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समणाऱ्यांनी अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य त्यांच्याकडे असू नये.’, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अंधारेंना असा निर्वाणीचा इशारा दिलाय.