पुण्यात ‘दीनानाथ मंगेशकर’मध्ये गर्भवतीचा मृत्यू, ‘त्या’ 10 लाखांसंदर्भात अहवालात रूग्णालयाची कबुली, आता काय कारवाई?
पुण्याच्या दिननाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी पाहायला मिळाली. दहा लाख रुपये न भरल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पैशाची मागणी केली होती हे रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट झाल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हाय लेव्हल कमिटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिलेत.
दहा लाख रूपये अॅडवान्स न भरल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाविरोधात एकच संतापाची लाट उसळली. तर मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्या खासगी रूग्णालयाचीही तोडफोड करण्यात आली. मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून पैशांची बाब कबुल करताना भिसे कुटुंबावरच ठपका ठेवलाय. रुग्णालय प्रशासनाने म्हंटलंय की ईश्वरी भिसे यांच्या जुळ्या बाळांची प्रसूती धोक्यादायक होती. ईश्वरी भिसे गेल्या सहा महिन्यांपासून प्रसूतीपूर्व तपासणी, एएनसी चेकअपसाठी आल्या नाहीत. वैद्यकीय सल्ले मानले नाहीत तसंच जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्यामुळे रागांतून दिशाभूल करणारी तक्रार केलेली आहे.
रुग्णालयाला आधी दहा लाख भरा नंतरच अॅडमिट करू अशी ताठर भूमिका घेतल्याने ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांनी म्हंटल आहे. त्या दहा लाखांसंदर्भात रुग्णालयाने अहवालातही उल्लेख केला. कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुलं, जुळ्या आजाऱ्याची गुंतागुंत आणि दोन ते अडीच महिने एनआयसीयूचे उपचार लागतील हे समजावून सांगितलं. दहा ते वीस लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो असं सांगितलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकर यांनी जमेल तेवढे पैसे भरा म्हणजे नातेवाईकांप्रमाणे दोन ते अडीच लाख मग मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं सांगितलं. डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशाची तजवीज करतोय.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
