VIDEO |चंद्रावरील दक्षिण ध्रुव हा 'शिवशक्ती' ओळखला जाणार

VIDEO |चंद्रावरील दक्षिण ध्रुव हा ‘शिवशक्ती’ ओळखला जाणार

| Updated on: Aug 26, 2023 | 10:37 AM

जगाच्या इतिहासात 23 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे. याच दिवशी भारताच्या प्रयत्नांना यश आले असून चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर भारताचे चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग झाले. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी महत्वाच्या तीन घोषणा केल्या.

बेंगळुरू : 26 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश संपवून आज मायदेशात परतले. यावेळी त्यांनी सगळ्यात आधी बेंगळुरू जाऊन इस्त्रोतील शास्त्रज्ञांची पाठ थोपटली. त्यांच्या कार्याचे गौरव केले. त्यावेळी त्यांनी 23 ऑगस्टच्या दिवसातील आठवणी सांगताना, त्या दिनसाचा प्रत्येक्ष क्षण आपल्या डोळ्यांसमोर फिरत असल्याचे सांगितले. तर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग होताच जो देशात आणि परदेशात जल्लोष झाला ते कोणीही विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

तसेच चांद्रयान महाअभियान हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचे यश आहे. याचदरम्यान मोदींनी तीन मोठ्या घोषणाही केल्या. त्यांत त्यांनी सांगितले की, आमचे लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले ते आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल. त्याचवेळी चांद्रयान-2 मिशनमध्ये विक्रम लँडर जिथे पोहोचला, त्या जागेला ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल. तर 23 ऑगस्ट या दिवशी पहिल्यांदा चंद्रावरील दक्षिण धृवावर चांद्रयान-३ ने सॉफ्ट लँडिंग केलं. त्यामुळे यापुढे 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल.

Published on: Aug 26, 2023 10:37 AM